महत्वाच्या बातम्या

 आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांची कामठी उपजिल्हा रुग्णालयास भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : संभाव्य कोविड चौथ्या लाटेच्या पूर्वतयारीस्तव सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मॉकड्रील घेण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव  संजय खंदारे यांनी कोविडबाबत

पूर्वतयारीचा आढावा घेण्यास्तव उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे प्रत्यक्ष भेट दिली.

प्रधान सचिव यांनी भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालय कामठी येथील ऑक्सीजन पी. एस.ए. प्लान्ट,डॉक्टर्स व स्टाफचे कोविड बाबत प्रशिक्षण, ऑक्सीजन खाटाची उपलब्धता, प्रत्यक्ष रुग्णभरतीची रंगीत तालीम इत्यादी बाबींचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयातील औषधी भंडार, कोविड रुग्णांकरीता तयार ठेवण्यात आलेला वॉर्ड, साधन सामुग्रीची उपलब्धता, स्टाफ ऑक्सीजन सिलींडर व कॉन्स्ट्रेटर वापरु शकण्याचे प्रात्यक्षिक इत्यादी बाबींची पाहणी केली.

भेटीदरम्यान प्रधान सचिव यांचेसमवेत डॉ. विनिता जैन, उपसंचालक, आरोग्यसेवा, नागपूर मंडळ, नागपूर या सुध्दा उपस्थित होत्या. मान्यवरांनी उपजिल्हा रुग्णालय कामठी  येथील व्यवस्था तपासून उपस्थित डॉक्टर्स व स्टाफ यांना पुढील संभाव्य लाटेबाबत तयार राहण्यासंबंधी सुचित केले.





  Print






News - Nagpur




Related Photos