देसाईगंज नगर परिषद च्या पथकांद्वारे प्लास्टिक साहित्य जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
नगर परिषद परिषदेच्या  भरारी पथकाने  मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्या नेतृत्वात शहरातील विविध दुकानात धाडी टाकुन शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तु दुकानात विक्रीसाठी आढळुन आल्याने  जप्त केले आहेत. 
 सदर साहित्य जप्त करुन नगर परिषद कार्यालयात जमा  करण्यात आले आहे. जप्त केलेला माल जवळपास १० हजार रुपये  किमतिचा असल्याचे समजते. सदर कार्यवाही न प अभियंता बोंदरे, जुमनाके, लवकुश उरकुडे, उदय सोनेकर, प्रेमचंद चवारे, किशोर पुरकाम, राजु निंबेकर यांनी केली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-12


Related Photos