येळाकेळी येथील मुलाचा शस्त्रक्रियेअभावी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा : 
सेलू येथील तहसीलदारांकडून  उत्पन्नाचा दाखला देण्यास  विलंब  झाल्याने  येळाकेळीच्या एका मुलाचा  शस्त्रक्रियेअभावी  मृत्यू  झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
याबाबत  सदरचा  दाखल अर्ज केल्यांनतर  २२ तास ५९ मिनिटाने  तर ४८ तास आधी दिल्याची स्पष्टोक्ती सेलूचे  तहसिलदार महेंद्र सोनोने यांनी दिली. ६ ऑक्टोबर  रोजी तालुक्यातील  येळाकेळी येथिल साहिल  गजानन  घुमे  (१२)   याचा हृदय विकाराच्या  आजाराने  मृत्यू   झाला. मृतक साहिल हा गरीब कुटुंबातील असल्याने  त्याच्यावर शासकीय योजनेतून  शस्त्रक्रिया  करण्यासाठी  ऑनलाईन उत्पनाचा  दाखला प्राप्त  करण्यासाठी येळाकेळीच्या एका केंद्रातून अर्ज केला होता .हा अर्ज. ३ ऑक्टोबर  रोजी करण्यात आला होता.  तर ४  ऑक्टोबर रोजी  सदर उत्पन्नाचा दाखला देण्यात आला होता. तहसीलदार महेंद्र सोनोने  यांनी सांगितले कि मृतकाच्या तब्येतीविषयी मला माहिती होती.  त्यामुळेच मी राशनकार्ड  मध्ये प्राथमिकता देऊन मृतकाचे नाव समाविष्ट केले होते.  शस्त्रक्रिया आणि उत्पन्नाचा दाखला याचा काहीही संबंध नसून दाखला नंतरही दाखल करता येतो.  परंतु मृतकाचे मामा प्रकाश चौधरी यांनी चुकीची माहिती देऊन दाखल्याअभावी मृत्यू झाल्याचा आरोप केला असे तहसीलदार  महेंद्र सोनोने यांनी म्हटले आहे.   Print


News - Wardha | Posted : 2018-10-11


Related Photos