महत्वाच्या बातम्या

 विदर्भात ५२ कोटींची वीजचोरी : ६ महिन्यात ९८ ग्राहकांवर गुन्हा दाखल


- वीजचोरीच्या विरोधात सातत्याने कारवाई केली जात असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महावितरणच्या सुरक्षा व क्रियान्वयन विभागाने गेल्या सहा महिन्यांतील कारवाईमध्ये ५२ कोटी रुपयांची वीजचोरी झाल्याचा खुलासा केला आहे. या दरम्यान, दंड न भरणाऱ्या ९८ वीज ग्राहकांच्या विरोधात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नागपूर प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत उपसंचालक (सुरक्षा व क्रियान्वयन) च्या माध्यमातून एप्रिल, २०२२ ते सप्टेंबर, २०२२ पर्यंत विदर्भात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून एकूण १ हजार २७३ स्थळांवर वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. प्राप्त आकडेवारीनुसार ५२ कोटी २३ लाख रुपये मूल्याची वीजचोरी झाली आहे. वीज कायद्याच्या १३५ व १२६ कलमांतर्गत ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत ९८ ग्राहकांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वीजचोरीच्या विरोधात सातत्याने कारवाई केली जात असल्याचा दावा महावितरणने केला आहे. वीजचोरीची माहिती देण्याचे आवाहन करतानाच माहिती देणाऱ्याचे नाव उघड करण्यात येणार नसल्याचे आश्वासनही महावितरणने दिले आहे. यासोबतच अशा व्यक्तींना पुरस्कृतही करण्यात येणार आहे. कार्यकारी संचालक (सुरक्षा व क्रियान्वयन), मुंबईच्या मार्गदर्शनात उपसंचालक सुनील थापेकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. मंडळ स्तरावर १२ पथक आणि विभागीय स्तरावर तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos