महत्वाच्या बातम्या

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत  फळबाग लागवडीकरिता पात्र न ठरू शकणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचा लाभ देण्याकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली आहे. तरी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सण २०१८-१९ पासुन स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू झाली आहे. कोवीड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या बचतीच्या धोरणामुळे सण २०२०-२१ व सण २०२१-२२ या वर्षासाठी आर्थिक लक्ष देण्यात आलेला नव्हता. परंतु सण २०२२-२३ मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. तरी फळबागांचे क्षेत्र वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा या हेतुने सुरू झालेल्या या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याकरिता नजीकच्या सरकार सेवा केंद्रावर किंवा ऑनलाईन पध्दतीने https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos