महत्वाच्या बातम्या

 2 जानेवारीपासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा : गाईडलाईन्स जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीतील विद्यार्थ्यांचे गुण/इंटरनल ग्रेड अपलोड करण्याचे निर्देश बोर्डाने शाळांना दिले आहेत.

सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर पूर्ण करण्याचे आवाहन बोर्डाने शाळांना केले आहे. बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE ने 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यंदा परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे.

गेल्या वर्षी सीबीएसईने परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसे होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसईने परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षा/प्रोजेक्ट असेसमेंट/अंतर्गत मुल्यांकनामध्ये बसू शकतात. जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सर्व विद्यार्थ्यांना सूचना द्या की, त्यांना दिलेल्या वेळापत्रकातच प्रॅक्टिकल परीक्षा द्यावा लागतील. परीक्षेच्या दिवशी कोणत्याही कारणाने गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा निश्चित तारखांमध्ये पुन्हा घेतली जाईल.

बोर्डाने सांगितले की, प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याचे नोंदवण्यात यावे आणि एखाद्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा इतर कोणत्याही तारखेला घेतली जाणार असेल तर त्याची अनुपस्थितऐवजी रीशेड्यूल अशी नोंद केली जावी. असे सांगितले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos