आरमोरितील जनता कर्फ्युला स्थगिती : सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत राहणार दुकाने सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
शहरात २८ सप्टेंबर सोमवारपासून ५ ऑक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला घेऊन दोन गट पडल्याने अखेर जनता कर्फ्यु रद्द करण्यात आल्याची माहिती व्यापारी महासंघाने २७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत दिली.
जनता कर्फ्युच्या बदल्यात दुसरा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये शहरातील सर्व लहान मोठे व्यावसायिक २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत आपले दुकान सकाळी ८ वाजता ते दुपारी २ वाजता पर्यंत सुरू ठेवण्याचे ठरविले. यासोबत मास्क लावणे, अंतर ठेवणे, ग्राहकाला मास्क लावूनच दुकानात प्रवेश देणे, नियमाचे उलंघण केल्यास दंड ठोठावून ताकीद देणे आदी निर्णयावर एकमताने निर्णय घेण्यात आला.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-28


Related Photos