शिवसेनेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय संविधान दिनानिमित्त मंगलमूर्ती लॉन्स येथे शिवसेना (उबाठा) च्या वतीने संविधान दिनाचा कार्यक्रम हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाचे महत्त्व, भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाने दिलेले अधिकार याबाबत उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून चंद्रपूर जिल्हा उप प्रमुख सिक्की यादव, महिला जिल्हाप्रमुख कल्पना गोरघटे, जिल्हा समन्वयक प्रदीप गेडाम, नगरसेवक घनश्याम मूलचंदानी शहरप्रमुख प्रशांत मेश्राम, महिला तालुकाप्रमुख मीनाक्षी गलगट, महिला शहरप्रमुख अंजली शिवबन्सी, सलमा परवीन, पार्वती यादव, आशा माझी, अनिता माझी, नगरसेवक मनोज बेले, सागर राऊत, परिष महाजनवार, विनोद बुरांडे, आरोग्य सेनेचे सोनू श्रीवास, राकेश मूलचंदानी, प्राणेश हमराज, सुधाकर भाऊ पोपले यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संविधान दिनानिमित्त सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देत उपस्थितांना मसाला भाताचे वाटप करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून संविधानाप्रती आदर आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.




Petrol Price




