महत्वाच्या बातम्या

 शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा


- इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इयत्ता १ ली ते १० वी तसेच इयत्ता ११ वी ते १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ. संतोष गवई यांनी केले आहे.

या शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्जासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यानुसार वर्धा जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित शिष्यवृत्ती योजनांची माहिती घेऊन राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज सादर करावा.

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos