महत्वाच्या बातम्या

 खदानीत बुडून ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : गोधनी मार्गावरील पिटेसूर खदानीत बुडून ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत मुलाचे नाव अब्दुल सजेन अब्दुल रज्जाक वय ११, रा. पिटेसूर, गोधनी मार्ग असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास अब्दुल हा घराजवळील खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मुलाचे वडील अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार यांच्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos