भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दीर्घ आजाराने निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज ३१ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने  निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांच्यावर १० ऑगस्ट रोजी मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवस ते व्हेंटिलेटरवरच होते. त्यातच त्यांची आज प्राणज्योत मालवली.
अभिजित मुखर्जी यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. त्यांनी यासंदर्भात ट्विट सुद्धा केले आहे.
  Print


News - World | Posted : 2020-08-31


Related Photos