सिंदेवाहीत नव प्रविष्ट पोलीस शिपाई यांचे सत्कार तर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस चंद्रभान सोनवाणे यांचा समारोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : नुकतीच नव्याने पोलिस भरती झाली होती त्यात सिंदेवाही तालुक्यातील १० विध्यर्थी पोलीस शिपाई म्हणून उत्तीर्ण झालेले आहे. त्यामुळे या सर्वांचा सत्कार तसेच पोलीस विभागाला ३४ वर्ष सेवा देणारे सहाय्यक पोलीस चंद्रभान सोनवाणे यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम गुरुवार ७ मे रोजी सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष् सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे तर प्रमुख पाहुणे स. पो. नि. सतीश मेश्राम आणि राणी भोंडे, चंद्रभान सोनवाणे होते. यावेळी पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी नव्याने मेहनत करून लागलेल्या पोलीस भरती मधील युवकांना प्रेरणा व मार्गर्दर्शन केले तसेच समोरील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
सिंदेवाही तालुक्यातील एकूण १० विध्यार्थी मध्ये राकेश झोडे वासेरा, प्रविणा कोकोडे मेंढामाल, अजय निकुरे सिंदेवाही, निशिका कामतवार सिंदेवाही, सचिन बोरकर सिंदेवाही, शुभम मंडलवार टेकरी, आकाश खोब्रागडे सिंदेवाही, वैशाली धात्रक वासेरा. मयूर कोसरे रत्नापूर, अंजली कुंभरे सिंदेवाही. अश्या एकूण १० लोकांची नव्याने पोलीस विभागामध्ये निवड झालेली असून या सर्वांचा आई, वडिलांसह सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन महिला पोलिस चंचल सुर्यवंशी, तर आभार महिला पोलिस पुजा पारधी यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




