महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील नागरीकांनी सर्वेक्षणाकरीता सहकार्य करावे


- मुख्याधिकारी,डॉ.कुलभुषण रामटेके यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : आकांक्षित गडचिरोली जिल्हयात जिल्हाधिकारी यांच्या पथदर्शी कार्यक्रम असलेल्या ब्लॉक चैन प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध 51 योजनांचा लाभ देण्यासाठी शहर व संपूर्ण जिल्हयात सर्व्हेक्षकांकडून घरोघरी जाऊन मोबाईल ॲपचे माध्यमातून मतदान कार्ड, आधार कार्ड ,बँक पासबुक ईत्यादी वरील माहिती नोंदविण्यात येत आहे. तसेच सर्वेक्षणासबंधी याची माहिती नगर परिषदेच्या घंटागडृयावर ध्वनीफितीद्वारे वार्डावार्डात देण्यात येत आहे. परंतू तरीही काही नागरीकांकडून यास विरोध केला जात आहे व विचारण्यात आलेली माहिती उपलब्ध करुन दिली जात नाही, त्यामुळे शासनास आवश्यक असलेला नागरीकांचा डेटा मिळविणे कठीण होत आहे. या माध्यमातून मिळविण्यात येत असलेली माहिती शासनाच्या कल्याणकारी योजनांपासुन वंचित राहीलेल्या गरजू लाभार्थीना फायदा व्हावा हाच हेतू आहे. करीता शहरातील नागरीकांनी आपले घरी येणाऱ्या सर्वेक्षकांना सर्वेक्षणाच्या कामास सहकार्य करावे.जेणेकरुन विविध शासकिय कल्याणकारी योजनांपासुन वंचित राहीलेल्या पात्र लाभार्थींना होईल. असे आवाहन नगर परिषदेद्वारे मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos