धक्कादायक : गडचिरोली जिल्हयात एकाच दिवशी ७२ एसआरपीएफ जवानांसह एकाचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह


- एकुण कोरानाबाधित रूग्ण २७९ तर आतापर्यंत ११३ रूग्ण झाले कोरोनामुक्त, सध्या सक्रीय कारोनाबाधित रूग्ण १६५

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयात आज नव्याने ७३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात ७२ एसआरपीएफ जवानांसह पोलिस विभागातील मुंबईहून परतलेला एकाचा समावेश आहे. या सर्वाना जिल्हयात दाखल झाल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते असे आरोग्य विभागाने कळविले आहे. यामुळे जिल्हयातील सक्रीय कोरोनाबधितांची संख्या आता १६५  झाली आहे तर एकुण कोरोनाबाधितांची संख्या २७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत १३३ कारोनाबाधितांनी यशस्वीरित्या मात केली आहे त्यामूळे त्यांना दवाखाण्यातून सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळच्या सुमारास वडसा येथील एसआपीएफ चे ४ जवान कोरोनामुक्त झाले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-18


Related Photos