महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेषे


१८ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१४९३ : ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.

१८०९ : फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

१८८२ : अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.

१९०५ : लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

१९१८ : लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९२८ : वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.

१९३३ : प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.

१९५५ : भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

१९६२ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

१९६३ : पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.

१९९२ : ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९३ : दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

२०१५ : टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला

२०१५ : भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५ : भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

२०१५ : भारतीय शटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले

२०१५ : भारतीय महिला दुहेरी शटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.

२०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.

१८ नोव्हेंबर जन्म

१८९८ : भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म.

१९०१ : चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०)

१९०६ : मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)

१९०९ : कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७६)

१९१० : क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९६५)

१९३१ : हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य श्रीकांत वर्मा यांचा जन्म.

१९४५ : श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.

१८ नोव्हेंबर मृत्यू

१७७२ : मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)

१८३० : इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)

१९३६ : भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)

१९६२ : अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १८८५)

१९९३ : लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.

१९९६ : समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

१९९८ : भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६)

१९९८ : सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

१९९९ : स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.

२००१ : नाडेप कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका यांचे निधन.

२००६ : मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९१७)

२०१३ : भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९२९)

२०१४ : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.

२०१६ : हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक डेंटन कुली यांचे निधन (जन्म: २२ ऑगस्ट १९२०)

१९९८ : साताऱ्याच्या सामाजिक समाजसेवक बन्याबापू गोडबोले यांचे निधन

१९४० : बेसराबियन शैक्षणिक आणि राजकारणी, मोल्दोव्हाचे अध्यक्ष आयन इन्कुलेशन यांचे निधन (जन्म: ५ एप्रिल १८८४)

१८४१ : पेरू देशाचे १०वे आणि १४वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी ऑगस्टिन गामारा यांचे निधन (जन्म: २७ ऑगस्ट १७८५





  Print






Related Photos