महत्वाच्या बातम्या

 जप्त केलेल्या सिलिंडरचा पोलीस ठाण्यात स्फोट : दोन पोलीस गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई - वांद्रे पूर्व वसाहत येथील खेरवाडी पोलीस ठाण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
स्टोअर रुममधील सिलिंडरमुळे हा स्फोट झाला. अवैधरित्या उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर खेरवाडी पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला सिलिंडर स्टोअर रुमध्ये ठेवण्यात आला होता. याच सिलिंडरचा स्फोट झाला आहे.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर, सिलिंडर स्फोटामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos