महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२६ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८६३ : जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.

१९०५ : नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

१९३६ : हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.

१९४७ : जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.

१९५८ : पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.

१९६२ : रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

१९९४ : जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

१९९९ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.

२००६ : महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.

२६ ऑक्टोबर जन्म

१२७० : संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०) 

१८९० : भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)

१८९१ : सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४)

१९०० : माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९९३)

१९१६ : फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)

१९१९ : शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८०)

१९३७ : संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.

१९४७ : अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.

१९५४ : नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४) 

१९७४ : अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म.

१९४२ : भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती सर रॉजर भटनागर यांचा जन्म (मृत्यू : ७ नोव्हेंबर २०२२)

१९३३ : कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचा जन्म (मृत्यू : २६ डिसेंबर २०११)कॅलेंडर पहा

१८६९ : ब्राझील देशाचे १३वे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी वॉशिंग्टन लुइस यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑगस्ट १९५७)

२६ ऑक्टोबर मृत्यू

१९०९ : जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८४१)

१९३० : प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १८६०)

१९७९ : अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.

१९९१ : स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)

१९९९ : भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१०)

२०२२ : भारतीय चित्रपट दिग्दर्शक इस्माइल श्रॉफ यांचे निधन (जन्म: १२ ऑगस्ट १९६०)

२०२२ : भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार विनायक निम्हण यांचे निधन

२०२२ : भारतीय जेसुइट पुजारी आणि धर्मगुरू जॉर्ज नेदुंगट यांचे निधन (जन्म: २१ डिसेंबर १९३२)

२०१२ : स्नॅपलचे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचे निधन (जन्म: २ सप्टेंबर १९३२)

२००७ : अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक विजेते आर्थर कॉर्नबर्ग यांचे निधन (जन्म: ३ मार्च १९१८)

१९५७ : अमेरिकन बायोकेमिस्ट आणि फिजियोलॉजिस्ट - नोबेल पुरस्कार विजेते गेर्टी कोरी - चेक यांचे निधन (जन्म: १५ ऑगस्ट १८९६)





  Print






Related Photos