आष्टी येथे नदीपात्रात मगर मृतावस्थेत आढळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील केंद्रीय जल आयोग कार्यालयाच्या मागील  शेत शिवाराच्या जवळील वैनगंगा नदीपात्रात एक मगर मृतावस्थेत आढळून आले आहे. शेत शिवारात काम करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना  नदीच्या दिशेने वास येत असल्याचा भास झाला.  तेव्हा त्यानी जवळपास शोधाशोध केली  असता एक मोठी  मगर मृतास्थेत किनाऱ्यावर  पडून होती. 
 शेत शिवारात काम करणाऱ्यांनी  वनविभागाला माहिती दिली.    वनकर्मचारी घटनास्थळावर आल्यावर चौकशी केली.   मगर चार- पाच दिवसापासून मृत झाला  असुन याची लांबी १०  फुटाच्या जवळपास आहे असा प्राथमिक अंदाज  कर्मचाऱ्यांनी   व्यक्त केला   आहे. मागील काही दीवसापूर्वी वैनगंगा नदीत गोसेखुर्द  धरणाचे पाणी सोडण्यात आले  होते आणि ही मगर पाण्यात वाहत आली असेल असा अंदाज परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.  वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मार्कंडा कंसोबा आणि वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चौड़मपल्ली यांची एक चमु घटनास्थळावर येवून संयुक्त तपास करून पुढील तपास  वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करुण मगरी ची  योग्य व्हिलेवाट मोक्का पंचनामा करुण लावण्यात आली.  यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी मनीष पवार  चौड़मपल्ली,  एस.ए.यनगंटिवार, मंथनवार, तुरिले, आर एस मुत्तेवार ,गोवर्धन उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-31


Related Photos