महत्वाच्या बातम्या

 जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या व्यवस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


- जिल्हा क्रीडा संकुलातील स्टेडियम व सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी; विविध विभागांच्या तयारीची घेतली माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे१५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याच्या तयारीचाजिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या स्टेडियमची पाहणी करून त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करण्यात येतअसलेल्या विविध व्यवस्था, सुरक्षा नियोजन आणि आवश्यक सुविधांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली व आवश्यक सूचना दिल्या.

गडचिरोली येथे १३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मुख्य सोहळा १५ नोव्हेंबर रोजी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्याचे उद्घाटन करून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल,

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या स्टेडियमची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्य मंच,मान्यवरांची आसनव्यवस्था, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच प्रवेश व निर्गमन मार्गांच्या नियोजनाचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कामांची आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्यासुविधांची माहिती त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून घेतली.

देशस्तरीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळावरील सुरक्षा व्यवस्थेचीहीपाहणी केली. अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरक्षा नियोजन, प्रवेश व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व इतर संबंधित विभागांकडून करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेऊन विविध विभागांमधील समन्वयाचाही आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





  Print






Related Photos