सिरोंचा पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : १६ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी, अहेरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सिरोंचा येथे नागपूर-वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विभाग पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
ही बैठक माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक नियोजन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार, माजी आमदार सुधाकरजी कोहळे यांच्या विजयासाठी प्रत्येक पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा एकमुखी संकल्प करण्यात आला. सुधाकरजी कोहळे हे अभ्यासू नेते असून पदवीधरांच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाण याचा निवडणुकीत निश्चित फायदा होईल, असा विश्वास डॉ. उसेंडी यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते बाबूरावजी कोहळे, महामंत्री प्रकाशजी गेडाम, तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत, ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचलवार, दामोधर आरिगेलवार, संदीप राचर्लावार, महेश कोलावार, रमेश मुंगीवार, रवी चाकिनारपूवार, माधव कासारलावार, राजेश संतोषवार, नागेश ताडबोईना, गणेश टागरे, संतोष राचावार, शारिक शेख, सुशांत नारणावरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




