महत्वाच्या बातम्या

 जीवनात पुन्हा भरारी घ्या : डॉ. बोकारे कुलगुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस                  

प्रतिनिधी / आष्टी : जीवन जगताना माणसाच्या जीवनात अनेक यश -अपयश येतात त्यातही लाखो युवक खेळामध्ये कारकीर्द करण्याकरता प्रयत्न करतात परंतु त्यात एखाद्या सचिन तेंडुलकर यालाच यश येते बाकीच्यांना यश येत नाही आणि म्हणून तुम्ही खचून न जाता जीवनामध्ये पुन्हा भरारी घ्या असे मोलाचे मार्गदर्शन डॉ. प्रशांत बोकारे,कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली. यांनी भारतीय खेड प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार खेलो इंडिया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील धनुरविद्या प्रशिक्षण केंद्राला भेट देताना केली.या वेळेला प्रा.शाम कोरडे यांनी खेलो इंडिया अंतर्गत धनुरविद्या प्रशिक्षणाचे केंद्राची संपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर या वेळेला प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, प्राचार्य खराती, प्रा. रवी गजभिये, अवसरमोल, बैस हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. भारत पांडे यांनी केले. या वेळेला कुलगुरू यांनी विद्यार्थ्यासोबत अनेक विषयावर प्रश्न-उत्तर विचारून त्यांना जीवनात कधीही गरज वाटली तर विद्यापीठ आपल्यासाठी सदैव खुले आहे, असे आश्वासन दिले आणि त्याचबरोबर खेलो इंडिया केंद्राचे पूर्ण निरक्षण करून पुन्हा मी तुम्हाला भेटायला येईल. तुम्ही पण आमच्या विद्यापीठात या असं आवाहन केले प्रत्यक्षात प्रशिक्षण विद्यार्थी व कुलगुरू यांच्या आमने-सामने भेटून चर्चा करण्याच्या पहिल्या प्रसंगात आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यात, मनात उत्साह होता आणि आता आम्हीही जीवनात काही करू, असा विश्वास खेडो इंडिया अंतर्गत धनुर्विद्या प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos