महत्वाच्या बातम्या

 खाद्यपदार्थांमध्ये खुल्या तेलाचा वापर करण्यास परवानगी द्यावी


- खासदार रामदास तडस यांची नियम 377 अंतर्गत लोकसभेत मागणी

- लोकसभेत नियम 377 अंतर्गत उपस्थित केला मुद्दा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / दिल्ली : भारतात खाद्यतेलाच्या एकून वापरापैकी 60 टक्के ते 65 टक्के तेल सुटया स्वरुपात विक्री होते. परंतु सुटे खाद्य तेलाच्या विक्री करण्याकरिता बंदी करण्यात आलेली आहे. अनेक छोटे व्यापारी, लाकडी तेल घाण्याने तेल काढणारे, तसेच शेतकरी व कामगार लोकांना सुटे तेल कमी भावात मिळत असल्यामुळे त्यांना फायदा होतो, परंतु अधिकारी वर्ग सुटे तेल विकण्याकरिता चौकशी नावाखाली कार्यवाही करीत असल्यामुळे सर्व सामान्य व्यापारी, सामान्य जनतेला त्रास होत असल्यामुळे अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ वर्धा व इतरही छोटे व्यापाऱ्यांनी सुटे खाद्य तेल विक्रीवरील बंदी हटविण्याबाबत व याबाबत केन्द्र शासनाकडे प्रश्न उपस्थित करण्याबाबत खासदार रामदास तडस यांच्याकडे विनंती केलेली होती. त्या अनुषंगाने वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी आज लोकसभेत नियम 377 अंतर्गत सुटे खाद्य मुद्दा उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

2006 मध्ये तत्कालीन सरकारने अन्न आणि सुरक्षा विधेयक लोकसभेत आणले होते, जे 2011 मध्ये सभागृहाने मंजूर केले होते, या बिलात किरकोळ सुटे तेल विक्रीवर बंदी घातली आहे, त्यामुळे खुले तेल विक्रेत्याला त्रास होत आहे, कारण अजूनही देशभरातील सुमारे ६० टक्के लोक मध्यम व निम्नवर्गीय, सुटे खाद्य तेल वापरतात कारण सुटे खाद्यतेल बाजारात कॅनमधील तेलापेक्षा खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे. मागील सरकारने अंमलात आणलेले हे अन्न व सुरक्षा विधेयक निम्न व मध्यमवर्गीय लोकांसाठी फायदेशीर नसून जनतेला व किरकोळ व्यापा-यांना त्रासदायक आहे, त्यामुळे या विधेयकात सुधारणा करताना किरकोळ खाद्यपदार्थांमध्ये खुल्या तेलाचा वापर करण्यास परवानगी द्यावी जेणेकरून मध्यम आणि निम्न वर्गीय लोकांना दिलासा मिळेल अशी मा. खाद्य व उपभोक्ता मंत्री यांना खासदार रामदास तडस यांनी नियम 377 अंतर्गत लोकसभेत विनंती केली.

भारतात आजही ग्रामीण भागात खुल्या तेलाचा वापर जास्त प्रमाणात होते, तसेच लघुउद्योगाच्या माध्यमातुन तेल घाणीचा व्यवसाय सुध्दा केला जातो, त्यामुळे 2006 मध्ये तत्कालीन सरकारने अन्न आणि सुरक्षा विधेयक मध्ये खुले तेलाच्या विक्री बंदी असल्यामुळे छोटे उद्योग करणारे तसेच तेलघाणी व इतरही व्यापा-यांना याचा त्रास होत आहे, सुटे तेल पॅकींगच्या तेलापेक्षा स्वस्त असल्यामुळे सर्वसाधारण नागरिक, शेतकरी, कामगार यांना फायदा होतो, त्यामुळे सरकारने खाद्यपदार्थांमध्ये खुल्या तेलाचा वापर करण्यास परवानगी देणे आवश्यक असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.





  Print






News - Rajy




Related Photos