आदेशाचे उल्लंघन करत सामूहिक नमाज पठण, ३६ जण ताब्यात


-  सांगली पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था /सांगली :
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. असे असले तरी सोलापुरात शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी ७० जण जमले होते. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे.
दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजचे उदाहरण ताजे असताना सोलापुरात ७० जण शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी जमले होते. सरकारचे आदेश झुगारून नमाजसाठी हे लोक एकत्र जमले होते. फक्त सोलापुरातच नाही तर धुळ्यातही ३६ जण नमाज पठण करण्यासाठी एकत्र जमले होते. पोलिसांनी या ३६ जणांनाही ताब्यात घेतले आहे. लोकांनी गर्दी करू नये असे आम्ही वारंवार आवाहन करत आहोत असे पोलिसांनी सांगितले. पण लोक ऐकत नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असेही पोलिसांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दी करू नका असे सरकार वारंवार आवाहन करत आहेत. परंतु या आवाहनाला लोकांकडूनच हरताळ फासला जात आहे. नमाज करण्यासाठीच नव्हे तर भाजी घेण्यासाठीही लोक मोठी गर्दी करत आहेत. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंग पाळलीच जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-03


Related Photos