राज्यात कोरोनाचा दहावा बळी : रुग्णांची संख्या २२० वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
  राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, आज दिवसभरात करोनाची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यानंतर मुंबईतील एका रुग्णालयात ७८ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. हा राज्यातील दहावा बळी आहे. तर राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या २२० झाली आहे.
राज्यात आज करोनाच्या १७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून, ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर, नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बऱ्या झालेल्या एकूण ३९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. आज दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-30


Related Photos