नगर परिषद गांधी विद्यालय टेकडी येथे निरोप समारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद गांधी विद्यालय टेकडी शाखा येथे 23 फेब्रुवारीला 10 व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना 9 व्या वर्गाकडून निरोप समारंभ देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. परचाके होत्या. तर टेकडी शाळेचे प्रमुख राकेश पायताडे यांची उपस्थिती होती.
तसेच कु. प्रज्ञा खोब्रागडे, कु. लता येरमे , सौ. इंदिरा झाडे , मनोहर राठोड , आशिष राजनहिरे , दिनेश पावडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना 10 वी बोर्डचे पेपर कसे सोडवायचे त्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांना शालंत परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन कु. समृद्धी रामटेके या विद्यार्थिनी केले. तर आभार प्रदर्शन कु. मनस्वी शिंदे या विद्यार्थिनी केले. कार्यक्रमाला 9 वी व 10 वी चे संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.
News - Chandrapur