महत्वाच्या बातम्या

 सामाजिक कार्यकर्ते बाळु मडावी यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सामाजिक कार्यकर्ते मनमिळावू अशी प्रतिमा असलेले गडचिरोली शहरातील काँग्रेस कार्यकर्ते बाळु मडावी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. बाळु मडावी यांना ४ डिसेंबर ला ११:३०च्या सुमारास अचानक प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात भरती केले असता, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
त्यांच्या मागे पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, आणि तीन वर्षाची मुलगी आहे. बाळु यांच्या आकस्मिक निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर
आज अंत्यसंस्कार होणार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos