कारागृहातील बंद्यांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचे धनादेशाचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, गडचिरोली यांचे कार्यालयातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या ० ते १८ वयोगटातील गडचिरोली जिल्हयातील पाल्यांना शैक्षणिक पुनर्वसनात्मक दृष्टीने बालसंगोपन योजनेचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आलेत. कार्यक्रमात २० लाभार्थ्यांना एकत्रितपणे बालसंगोपन योजनांचे धनादेश वितरण करण्यात आले.
 महाराष्ट्र राज्य,टाटा ट्रस्ट मुंबई, व कारागृह विभाग यांचे मधील साम्यजस्य करारानुसार कारागृह विभागात फ्रेबुवारी २०१७ पासून '' बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प '' कार्यरत आहे. प्रकल्पा अतंर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात ४ सामाजिक कार्यकर्ता यांचे नियुक्ती करण्यात आलेले आहेत. याच सामाजिक कार्यकर्ता यांचे माध्यमाने बंद्यांच्या बाहेरील पाल्यांना बालसंगोपन योजना उपलब्ध करुन देणे कार्यात प्रत्यक्ष बंदीच्या घरी गृहभेट घेवून योजना निहाय मार्गदर्शन तथा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन सदरील पूर्ण प्रस्थाव संबधित जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांचे कडे सादर करणे व नियमितपणे पाठपुराव्यानंतर सदरील कार्यालयाच्या वतीने बालसंगोपन योजनाचे धनादेश वितरण कार्य पूर्ण करण्यात आलेले आहे. 
 नियोजित धनादेश वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष अतुल भडांगे ,( जि. म. बाल कल्याण अधिकारी ) विशेष अतिथी अधिक्षक गडचिरोली जिल्हा खुले कारागृहे, बाळराजेद्र निमगडे, प्रकल्प समन्वयक ( बंदी कल्याण व पुर्नवसन प्रकल्प) नागपूर मध्यवर्ती कारागृह, जिल्हा परीविक्षा अधिकारी, किशोर खडगी,  मिना लाटकर  , यशवंत बावनकर , पुरुषोत्तम मुजुमदार  , प्रामुख्याने उपस्थित होते.
  मेश्राम यांनी बालसंगोपन योजना मंजूर प्रक्रियेतून कशा पध्दतीने वाटचाल करावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन  व कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रम मध्ये सहभागी लाभार्थ्यांना ( टाटा ट्रस्ट ) अंतर्गत प्रवास खर्च देण्यात येत  आहे असे नमुद केले. भडांगे म्हणाले की , योजना अंतर्गत ० ते १८ वयोगटातील प्रती पाल्य महिना ४२५ रुपये देण्यात येत असून अनुदान सहा महिन्या मध्ये लाभार्थ्यांना देण्यात येत आहे, योजना पाल्यांच्या शैक्षिणिक पुर्नवसनात्मक दृष्टीने अत्यंत लाभकारी आहे. योजनाचा उपयोग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात यावा  असे म्हणाले.   या वेळी निमगडे  म्हणाले योजनांचे बंदीच्या पाल्यांना लाभ उपलब्ध झाल्याने कारागृहातील चिंताग्रस्त बंदी चिंतामुक्त होत असल्याचा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन यशवंत बावनकर  यांनी तर आभार प्रदर्शन मिना लाटकर यांनी केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-01


Related Photos