महत्वाच्या बातम्या

 घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील तुकूम परिसरातील छत्रपतीनगर येथे सुरू असलेल्या बांधकामस्थळावरून इलेक्ट्रिक साहित्य व विविध मशिनरी चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आरोपीकडून सुमारे २८ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास छत्रपतीनगर, तुकूम येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने ड्रिल मशीन, कटर मशीन, ग्राइंडर मशीनसह बांधकामासाठी उपयोगी असलेले इलेक्ट्रिक साहित्य व इतर साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना ससुर उर्फ कोलकाता साहजन मंडल ३९ वर्ष रा. फुटनगर, चंद्रपूर, मूळ रा. पश्चिम बंगाल याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विविध कंपन्यांच्या ड्रिल मशीन, कटर मशीन, टायटन व रोटरमाइंडर मशीन, दरवाज्याचे कब्जे तसेच इतर बांधकाम साहित्य असे  सुमारे २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले 

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई व सखोल तपासासाठी त्याला रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भूरले, सुनील गौरकर, पोहवा सतीश अवथरे, लालू यादव, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, संदीप कांबळी, पोअं शशांक बदामवार, किशोर वाकाटे सह सायबर सेल चे पोहवा कार्तिक खनके, पोअं गुणवंत व अमिनेश यांनी केले.





  Print






Related Photos