मतीमंद मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार : पीडित मुलगी ५ महिन्याची गर्भवती


- आरमोरी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दखल, ५ आरोपिंना अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुका मुख्यालपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात काही नराधमांनी मतिमंद व शारीरिक विकलांग असलेल्या १९ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली .
सदर गुन्ह्याची माहिती अशी की यातील फिर्यादी महिलेची पुतणी वय १९ वर्षे ही मतिमंद व मानसिक विकलांग आहे. या मुलीवर मागील एक वर्षाच्या काळात पीडित मुलीच्या शारीरिक व मानसिक विकलांगतेचा फायदा घेत व तिच्या सोबत कोणी नसल्याचा फायदा घेत काही नराधमांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन कधी शेतात तर कधी घरी बलात्कार केला.
या बलात्कार प्रकरणात आरोपी मध्ये गावातील ३ व बाहेरगावचे २ असे ५ आरोपी असून या पाच ही आरोपींनी वेगवेगळ्या वेळेस गतीमंद मुलीला एकटे गाठून वेगवेगळी आमिषे दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिला चाकलेट व पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.  सदर प्रकरणाची माहिती कुठे दिली तर जिवानिशी ठार करू अशी धमकी सुद्धा तिला नराधमांनी दिली. सदर मतिमंद मुलगी ही पाच महिन्याची गरोदर राहिल्याने तिच्या घरच्यांनी तिचे वैद्यकीय तपासणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आल्याने फिर्यादीचे तक्रारी वरून सदरचा गुन्हा आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे . आरमोरी पोलीस स्टेशनमधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ह्या बलात्कार प्रकरणातील आरोपी मध्ये देविदास मनीराम कुमरे (३५) रा.कुकडी ता. आरमोरी , दिगंबर विश्वनाथ दुर्गे (५२) रा. विहिरगाव ता. आरमोरी , विजय गजानन कूमारे (२९) रा. कूकडी ता. आरमोरी, सुधाकर तुळशीराम कुमोटी (४५) रा. कुकडी ता. आरमोरी, व मेघशाम नामदेव पेंदाम (२४) रा. वडधा ता. आरमोरी असे आरोपींची नावे आहेत. आरोपींवर कलम ३७६(२)(L)५०६ भांदवी नुसार आरमोरी पोलिस  स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बलात्कार प्रकरणाचा अधिक तपास आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी पंकज बोडसे सपोनि व केतन चव्हाण सपोनि हे करीत आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-16


Related Photos