नागपुरातील एम्प्रेस मॉलमधील सलून व स्पा मध्ये देहव्यापाराच्या अड्डय़ावर धाड , तीन मुलींची सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
:  शहरातील एम्प्रेस मॉलमधील एका सलून व स्पा मध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर  शुक्रवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने  छापा टाकून तीन मुलींची सुटका केली, तर दलाल महिलेला अटक केली.  दर्शनी ऊर्फ खुशी अनिल ढकान (३५) रा. काचीमेट, वाडी असे आरोपी महिलेचे नाव आहे.
 दर्शनी हिचे शुक्रवारी तलाव परिसरातील एम्प्रेल मॉलच्या पहिल्या मजल्यावर ‘एन सलून अ‍ॅण्ड ब्युटी’  केंद्र आहे. या ठिकाणी अनेकजण कामाला आहेत. पीडित तीन तरुणींना काम देण्याच्या उद्देशाने ती त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवनी थोरात, दामोधर राजुरकर, शीतलाप्रसाद मिश्रा, संजय पांडे, मनोजसिंग चौहान, प्रफुल बोंद्रे, प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छायात राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, सामाजिक कार्यकर्त्यां पूनम रेवतकर, विजयराणी रेड्डी यांच्यासह सापळा रचला. त्यावेळी आरोपी महिलेने बनावट ग्राहकाकडून पैसे घेऊन एका मुलीसोबत आतमधील खोलीमध्ये पाठवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून पीडित तरुणींची सुटका केली.   Print


News - Nagpur | Posted : 2018-09-22


Related Photos