महत्वाच्या बातम्या

 दर ११ व्या मिनिटाला एका श्रद्धाचा मृत्यू : संयुक्त राष्ट्र संघाची धक्कादायक माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतात श्रद्धा वालकरची झालेली हत्या गंभीर चर्चेचा विषय झाली आहे. श्रद्धाच्या झालेल्या हत्याकांड प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड हा मुख्य आरोपी आहे. श्रद्धा हत्याकांडसारखीच अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत.

त्या प्रकरणामधून कधी बॉयफ्रेंड, कधी नवरा तर कधी प्रियकरानेच आपल्या जोडीदाराला संपवले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. गुटेरेस यांनी सांगितले की, दर 11 व्या मिनिटाला एका महिलेची हत्या केली जाते, आणि या अशा प्रकरणात जास्त करुन कधी घरातीलच लोकं असतात तर कधी महिलेचे पार्टनरच तिचा जीव घेतात अशीही माहितीही त्यांनी दिली आहे.

महिला हत्याकांड प्रकरणाविषयी माहिती देताना एंटोनिया गुटेरेस यांनी सांगितले की, महिलां विरोधात घडणाऱ्या या हिंसा मानवाधिकारविरोधी आहेत. त्यांच्या जगण्याचे हक्क बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यासाठी देशातील अस्तित्वात असलेल्या सरकारनी त्यासाठी राष्ट्रीय कृती आरखडा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. गुटेरेस यांनी हे 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन या कार्यक्रमाआधीच त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे.

त्यांनी सांगितले की दर 11 व्या मिनिटाला होणाऱ्या महिला हत्याकांडामध्ये तिचा जोडीदार किंवा तिच्याच घरातील लोकं तिला संपवत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गुटेरेस यांनी सांगितले की, महिला ऑनलाईन पद्धतीनेही त्यांचे शोषण केले जात आहे. महिलांच्या विरोधात घाणेरडी शेरेबाजी करणे, पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण आणि त्यांचे फोटो घेऊन त्यामध्ये नको ते बदल करणे या सारख्या घटना आता सर्रासरपणे केल्या जात आहेत.

या अशा प्रकारामुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर विपरित परिणाम होत आहेत. अशा गोष्टींमुळे मुक्तपणे जीवन जगण्यावर मर्यादा पडतात. तसेच यामुळे त्यांच्या मुलभूत अधिकारांवर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या होणाऱ्या हत्येमुळे एंटोनिया गुटेरेस यांनी अनेक देशातील सरकाराने त्यांनी जाहीर आवाहन केले आहे की, महिला आणि मुलींविरोधोत घडणाऱ्या वाईट घटनाविरोधात कडक पावले उचला.

यासाठी प्रत्येक देशातील सत्ताधारी लोकांनी सामान्य माणसांची मदत घेऊन राष्ट्रीय पातळीवर राबवण्यासाठी एक राष्ट्रीय कृती आरखडा बनवा. कायद्याचे उल्लंघन होणार नाही.

त्याबरोबरच महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या ज्या विविध संघटना आहेत, त्यांचा निधी वाढवण्या संदर्भातही विचार केला जावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 





  Print






News - World




Related Photos