आमगावच्या वैनगंगा नदीपात्रात तीन अल्पवयीन मुली बुडाल्या


- एक मुलगी बेपत्ता तर दोघींना वाचवण्यात आले यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
शहरापासून जवळच असलेल्या आमगाव येथील तीन अल्पवयीन मुली नजीकच्या वैनगंगा नदीपात्रात तीळ संक्रांतीच्या निमित्ताने आंघोळ करायला गेल्या असता एक मुलगी पाण्यात वाहुन गेल्याची धक्कादायक घटना बुधवार. १५ जानेवारी २०२० रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत तीनपैकी दोन मुलींना वाचवण्यात यश आले आहे. जान्हवी विश्वास नाकतोडे (१२) असे पाण्यात वाहुन गेलेल्या मुलीचे नाव असून सदर मुलगी गावातील दोन मुलींसोबत तिळसंक्रातीच्या निमीत्ताने लगतच्या नदी पाञात आंघोळ करीत असताना खोल पाण्यात बुडाल्या. दरम्यान स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात आरडाओरड करीत असल्याचे दिसुन येताच लगतच्या शेतात म्हशी चारत असलेल्या कैलास शंकर दोनाडकर (३२), रा. विर्शी वार्ड, देसाईगंज याने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी टाकुन अनुष्का मंगेश बगमारे (१२) या मुलीला वाचविण्यात यश मिळवले तर त्यांच्या आधाराने मयुरी राजेंन्द्र शेंडे (१२) या मुलीने पाण्याबाहेर निघण्यात यश मिळवले. जानव्ही नाकतोडे ही खोल पाण्यात बुडुन बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच देसाईगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदिप लांडे व चमुने तत्काळ घटनास्थळ गाठुन बेपत्ता झालेल्या मुलीचा कसुन शोध घेतला असता वृत्त लिहीस्तोवर सदर मुलगी कुठेही आढळुन आली नसल्याने लगतच्या डोहात फसली असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. देसाईगंज पोलिसांनी शोध मोहिम सुरुच ठेवली असुन लगतच्या विर्शी, जुनी वडसा, कुरुड, कोंढाळा या नदीघाटावर शोध घेतल्या जात आहे. सदर बेपत्ता झालेली मुलगी ही आमगावचे सरपंच योगेश नाकतोडे यांची पुतणी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-15


Related Photos