महत्वाच्या बातम्या

 दिव्यांगांना मोफत साहित्य वितरण, पुर्व तपासनी व नोंदणी शिबीरात दिव्यांगाचा उर्त्स्फुत प्रतिसाद


- यशवंत विद्यालय, घोराड येथे मोफत साहित्य वितरण पुर्व तपासनी व नोंदणी शिबीर संपन्न.

- जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिव्यांगासोबत साजरा केला वाढदिवस.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : दिव्यांग आत्मनिर्भर व्हावे, तसेच त्यांना मोफत साहित्य वितरण करण्याच्या दृष्टीकोनातुन वर्धा जिल्हयात मोठया प्रमाणात मोफत साहित्य वितरण पुर्व तपासनी व नोंदणी शिबीर प्रत्येक तालुक्यात यशस्वी आयोजन केले, सर्व तालुक्यात मोठया संख्येनी दिव्यांग सहभागी झाले यामध्ये ७ हजार पेक्षा जास्त दिव्यांगाची नोंद झालेली आहे. पुढे यामध्ये निवड झालेल्या सर्व दिव्यांगाना मोफत साहित्य वितरण करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यावेळी म्हणाले तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी वर्धा जिल्हयात मोफत साहित्य वितरण पुर्व तपासनी व नोंदणी शिबीर यशस्वी केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.

भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रीय खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम जबलपूर यांच्यामार्फत भारत सरकारच्या एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांगांना सेलु तालुक्यातील दिव्यांगाकरिता यशवंत विद्याालय घोराड येथे दिव्यांगांना मोफत साहित्य वितरण पुर्व तपासनी व नोंदणी शिबीर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी, देवानंद पानबुडे, सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र चोपडे, नायब तहसीलदार किरसान, नायब तहसीलदार राम कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वाडीभस्मे, भाजपा तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय जव्हेरी, कृ. अ.के.के.चव्हाण, वि.अ.ईश्वर मेसरे, सहाय्यक कार्यकारी अधिकारी मनोज भोवरे, विपीन पिसे, भुषण पारडकर, गोलू कामीनकर, पंचायत समिती सेलू येथील सर्व अधिकारी व कर्मचारी, तालुका वै.अ. सेलू अधिकारी व कर्मचारी, केन्द्रचालक, सचिव, तलाठी,आशासमन्वय/वर्कर उपस्थित होते.

मोफत साहित्य वितरण पुर्व तपासनी व नोंदणी शिबीरामध्ये मोठया संख्येने दिव्यांग उपस्थित होते, सायं. ५.०० वाजेपंर्यत तपासनी सुरु राहणार असुन यामध्ये ५००  पेक्षा जास्त दिव्यांगाची नोंदणी व तपासणी होणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती दिले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिव्यांगासोबत साजरा केला वाढदिवस

आज जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा वाढदिवस होता. त्यांनी त्याचा वाढदिवस मोफत साहित्य वितरण पुर्व तपासनी व नोंदणी शिबीरामध्ये आलेल्या सर्व दिव्यांगासोबत केक कापून साजरा केला. सर्व दिव्यांगानी व उपस्थित अधिकारी वर्गानी त्यांना वाढदिवसानिमीत्य शुभेच्छा दिले.

  Print


News - Wardha
Related Photos