महत्वाच्या बातम्या

 शिवजन्मोत्सवाला ह.भ.प. कांचन शिवानंद शेळके यांचे शिवव्याख्यान


- नवतरुण युवक मंडळ बळीराजा चौक (सुभाष वॉर्ड) यांचा पुढाकार : १७ फेब्रुवारीपासून उत्सवाला प्रारंभ

- विजय वडेट्टीवार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्र यांची विशेष उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शिवजन्मोत्सव सोहळा नवतरुण युवक मंडळ बळीराजा चौक सुभाष वार्ड यांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. सदर शिवजन्मोत्सव १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार असून या शिवजन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारीला सकाळी ७.०० वाजता स्वच्छता अभियान दुपारी १२.३० महाशिवरात्रि घटस्थापना महादेव मंदिर सुभाष व नवीन पाण्याची टाकी रात्री ६.३० वाजता उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण लगेच शिवचरित्रावर शिवव्याख्याते हरिभक्त परायण कुमारी कांचन शिवानंद शेळके अमडापूर पो. कुरडी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचे सायंकाळी ८.३० वाजता व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. 

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून विशेष उपस्थिती विजय वडेट्टीवार कॅबिनेट मंत्री तथा आमदार ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्र, शिवानी विजय वडेट्टीवार महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस सह उद्घाटक महेंद्र ब्राह्मणवाडे अध्यक्ष नामदेव उसेंडी प्रदेशाध्यक्ष आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार आणि निमंत्रित मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडेल. 

या शिवव्याख्यानाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिवजन्मोत्सवा दरम्यान १७ फेब्रुवारीला दुपारी २.५० ते ३.४० वाजता स्थळ जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कुरुड तथा राधेश्याम बाबा विद्यालय कुरुड येथे सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केलेली आहे. 

१९ फेब्रुवारी सायंकाळी ४.०० वाजता शिवाजी महाराजांची भव्य दिव्य पालखी सोहळा व लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम २० फेब्रुवारी दुपारी १.०० वाजता महादेव मंदिर येथे जाहीर कीर्तन व गोपाल काला सायंकाळी ४.०० वाजता, महाप्रसाद सायंकाळी ६.०० वाजता या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शिवप्रेमी यांनी आपली उपस्थिती दर्शवावी, असे आयोजक मंडळांनी आवाहन केलेले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos