दाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
  गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणाचे पाणी मागील तीन दिवसांपूर्वीच सोडण्यात आले आहे. मात्र कमी दाबामुळे  गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचलेले नाही. सध्या पावसाने दडी मारली असल्यामुळे धान पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. याबाबत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता छपरघरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अभियंता छपरघरे यांनी  इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहचेल अशी ग्वाही दिली. 
 गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील कासवी ,आष्टा ,  अंतरंजी , आरमोरी, रवी ,अरसोडा, वघाळा, सायगाव, शिवनी, पालोरा व देसाईगंज तालुक्यातील आमगाव, सावगी,कोकडी, तुळसी, कुरुड, कोंढाळा ,देसाईगंज, उसेगाव, एकपुर,विसोरा, फरी, शिवराजपुर या गावांना टियाडोह प्रकल्पाच्या पाण्याचा  लाभ मिळतो.  गडचिरोली जिल्ह्याला या धरणातील ४० टक्के वाटा मिळतो.   सध्या मागील चार दिवसांपासून मिळत असलेल्या पाण्याचा दाब कमी असल्यामुळे  शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचण्यास वेळ लागत होता.   शेतकऱ्यांनी या संदर्भात आमदार गजबे यांची भेट घेऊन माहिती. दिली. यामुळे   आमदार गजबे यांनी इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता छपरघरे यांची भेट घेतली व पाणी पूर्वरत करण्याचा सूचना केल्या.  बुधवार पासून पाणी पूर्वरत होणार असून याचा लाभ वडसा व आरमोरी तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना  मिळणार आहे, अशी माहिती आमदार कृष्णा गजबे यांनी दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-18


Related Photos