महत्वाच्या बातम्या

 वाचन प्रेरणा दिनाचे निमित्ताने ग्रंथप्रदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : शासकीय विभागीय ग्रंथालयात प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ व मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिनाचे निमित्ताने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी प्रदर्शनाचे उद्घाटन  साहित्यिक  तथा बालरक्षण समन्वयक प्रसेनजीत गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने बालकांना, पालकांना शिक्षकांना वाचनालय संस्कृतीचा ओळख करुन देणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानामुळे वाचनाचे स्वरुप बदलले आहे. तेव्हा वाचक कमी झाले, या नैराश्यातून बाहेर येवून अधिक जोमाने समाजापर्यंत पोहचावे, असेही ते म्हणाले.

कार्यालयातील ग्रंथपाल अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी कार्यालयातील ग्रंथांची मांडणी कपाटामध्ये दाखल क्रमांकानुसार करण्यात आली असून ग्रंथाची डेटा एंट्री ई ग्रंथालय आज्ञावलीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे वाचकांना ग्रंथ सहज उपलब्ध होतात. या ग्रंथ प्रदर्शनाचा सर्व वाचक, सभासद व नागरीक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. उपस्थितांचे आभार तांत्रिक सहाय्यक अस्मिता मनपे, यांनी मानले. या प्रसंगी कार्यालयातील कर्मचारी, सभासद व वाचक उपस्थित होते.





  Print






Related Photos