चौकीदाराची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आर्वी :
  वीटभट्टीवरील चौकीदाराची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना आर्वी पोलिसांनी अटक केली आहे.   श्याम ज्ञानेश्वर सोनवणे (२५),  नितेश शेषराव उईके (२७) आणि सावंत प्रमोद वलके (२८)  सर्व रा. हनुमान वॉर्ड, आर्वी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  तर संजय कृष्णराव माकोडे (५५) असे मृतकाचे नाव आहे. 
 फिर्यादी  रवींद्र तुळशीराम   (५०)  वर्ष रा. मेहर नगर, वर्धा रोड आर्वी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार  सारंगपुरी तलावाजवळील वीटभट्टीवरील चौकीदार   संजय कृष्णराव माकोडे (५५)   रा. हनुमान वॉर्ड आर्वी याची कोणीतरी अज्ञात आरोपींनी  ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता ते ७ ऑगस्ट रोजी ७ वाजताच्या दरम्यान  वीटभट्टी वरील घरात घुसून कुऱ्हाड व फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवानिशी ठार मारले. तक्रारीवरून पोलीस स्टेशन आर्वी येथे अप.क्र. ७१३/१८ कलम ३०२ भादवीचा नोंद करण्यात आला.  
सदर गुन्ह्याच्या  तपासात पोलीस अधीक्षक ,  उप विभागीय पोलीस अधिकारी  प्रदीप मैराळ व पो.नि चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धीरज बांडे, गोपाल ढोले, कविता फुसे, परमेश्वर आगासे, पोहवा गजानन लामसे, अमित जुवारे, विक्की मस्के, राजेश राठोड, विनोद वानखेडे, गजानन वेडनेरकर, विशाल मडावी, प्रवीण देशमुख, चंदू वाढवे, भूषण निघोट, अतुल भोयर, अवी बनसोड, अखिलेश गव्हाणे, अश्विन सुखदेवे, मनोज भोसले, प्रदीप दातारकर, पांडुरंग फुगनर यांचे  ४ पथक तयार केले.  आर्वी शहरात अज्ञात खबरेवरून आरोपी  श्याम ज्ञानेश्वर सोनवणे , नितेश शेषराव उईके,  सावंत प्रमोद वलके सर्व रा. हनुमान वॉर्ड, आर्वी यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली . आरोपींनी मृतकास  कुऱ्हाडीने, लाकडी काठीने मारहाण कारण जीवानिशी ठार केल्याची कबुली दिली.  आरोपीना सदर गुन्ह्यात अटक केली असून गुन्हा घडल्यापासून अवघ्या ४ तासात आर्वी पोलिसांनी अथक प्रयत्न करून गुन्हा उघडकीस आणला . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस  निरीक्षक संपत चव्हान हे  करीत आहेत. 

   Print


News - Wardha | Posted : 2018-08-08


Related Photos