महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त : २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अन्न व औषध प्रशासन  चंद्रपूर विभागाने २७ मे २०२६ रोजी शहरात धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल २ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बाबूपेठ वॉर्ड परिसरातील महादेव मंदिराजवळ राहणारा आरोपी शितल लक्ष्मीकांत साठोणे (वय २९) याच्याकडून हुक्का शिशा टोबॅको माजा १०८ नावाचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे ४५ किलो प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

सदर अन्नपदार्थ प्रतिबंधित असल्याने अन्न सुरक्षा विभागाने तो जप्त केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाणे, चंद्रपूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ०६३२/२६ दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई संयुक्त आयुक्त (अन्न) नागपूर के. आर. जयपूरकर आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) चंद्रपूर प्रवीण ए. उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश एम. कपगटे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी मुळे आणि कांबळे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos