महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर येथील मुर्ती तोडफोड प्रकरणातील आरोपीतास पोलीसांनी २४ तासांत घेतले ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बल्लारपुर ते चंद्रपूर रोडवरील भिवकुंड गावाच्या लगत रोडच्या बाजुला असलेल्या हनुमान मंदीरातील मुर्तीची कोणीतरी अज्ञात इसमाने तोडफोड करून अवहेलना केल्याची घटना  23 नोव्हेंबर 2022 ला रात्रीच्या वेळी घडली. सदर घटनेबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटना 24 नोव्हेंबर 2022 ला सकाळी माहीती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग संतोशसिंग परदेषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक पोस्टे बल्लारपूर उमेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीत इसमाचा तात्काळ शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक उमेश पाटील तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आदेशीत केले.

पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील सपोनि विकास गायकवाड यांचे सोबतच्या डिबी पथकातील अंमलदारांचे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदिप कापडे, सपोनि मंगेष भोयर यांचे सोबत स्थागुशा येथील अंमलदारांचे वेगवेगळे पथक तयार करून अज्ञात आरोपीची शोध मोहीम चालु केली.

सदर गुन्हा करण्याच्या पध्दतीचे अवलोकन केले असता सदर मुर्तीची तोडफोड ही कोणीतरी मनोरुग्न व्यक्तीने केली असावी असे सकृतदर्शनी दिसुन येत असल्याने त्या दृष्टिने शोध मोहीम चालु केली. सदर घटनास्थळावरून चारही दिशेला जाणारे वेगवेगळ्या रोडवरील रेल्वेस्थानके, बस स्थानक, धाबे व वर्दळीच्या ठिकाणी शोध मोहीम चालु केली. 21 नोव्हेंबर 2022 रोजी सदर शोध मोहीमे दरम्यान पोस्टें बल्लारपूरचे सपोनि गायकवाड व त्यांच्या पथकाला गोंडपिपरी रोड वर बल्लारपूर पासून 35 ते 40 कि.मी. चे अंतरावर रात्रीच्या वेळी रोडने एक संशयीत इसम जातांना दिसुन आला. सदर पथकाने त्यास ताब्यात घेतले त्यावेळी त्याचे हाताला व कपडयांना मुर्तीला असलेले तेल मिश्रीत सेंदूर लागल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर इसमानेच तोडफोड केल्याची खात्री पटली त्याचेकडे चैकशी केली असता त्याने मुर्तीची तोडफोड केल्याचे कबुल केले.

अधिक चौकोशी मध्ये तो नागपूर येथील रहीवाशी असल्याचे व तो मागील एक महीण्यापासुन घरामधुन निघुन असाच भटकंती करत असल्याचे दिसुन आले आहे. सकृतदर्शनी सदर इसम हा मनोरुग्न असल्याचे दिसुन येत असुन त्याची सखोल चौकोशी करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग संतोशसिंग परदेषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि विकास गायकवाड, सपोनि. रमीज मुलानी, स.फौ. सलीम शेख, पो.हवा. आनंद परचाके, सुधाकर वरघने सतिश पाटील, लंकेश नायडू, ना.पो.अं. सत्यवान कोटनाके, पो. अं.शेखर मातनकर, दिलीप आदे श्रीनिवास वाभिटकर, प्रसन्ना, मपोका सिमा पोरते, चालक द्रवस पोस्टे बल्लारपूर यांनी केली असून पुढील तपास पो.नि.उमेश पाटील हे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos