उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा गडचिरोली शहरात ठिकठिकाणी जल्लोष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांचा आज गुरुवार, 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता शिवाजी पाॅर्क मैदानावर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीचा गडचिरोली शहरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. गडचिरोली श्हारात माजी नगराध्यक्ष डाॅ. अश्विनी यादव यांच्या घरासमोरुन भव्य रॅली काढून फटाक्यांची आतषबाजी करुन शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तसेच शिवसेना जिल्हा कार्यालयाच्यावतीने शहरातील इंदिरा गांधी चैकात सुद्धा मोठया संख्येने पदाधिकारी व शिवसैनिकांनी जल्लोष करुन आनंद व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोददार, उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, शहर प्रमुख रामकिरीत यादव, गडचिरोली विधानसभा संघटक नंदू कुमरे, जिल्हा समन्वयक सुनील पोरेड्डीवार, तालुका प्रमुख गजानन नैताम, नवनाथ उके, नरेश केळझरकर, सुधाकर पेटकर, ज्ञानेश्वर बगमारे, संजय आकरे, वैभव धात्रक, दिलेश सुरकार, भास्कर मेश्राम, यश गण्यारपवार, चेतन कंदूकवार, हरिश, अभिजीत केळकर, अथर्व कापकर, कैलाश राऊत, विकास भोयर, सुरज ब्राम्हणवाडे, रुपेश मंटकवार, अनिकेत झरकर, पंकज नटलावार, कुमोद कोटगले, म्हशाखेत्री, कालीदास कुडवे, शकून नंदनवार, मंगला धात्रक, सरिफा शेख, निखाडे, शेख, राउत, भैसारे, मयुरी, श्रृती यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-28


Related Photos