सावित्रीबाई फुले यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार


-  क्रांतीविक्रम बहुउद्देशीय समिती,मरपली यांच्या  वतीने  सावित्रीबाई फुले  जयंती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : 
महात्मा फुले यांनी निरक्षर असलेल्या  सावित्रीबाई फुले यांना  साक्षर करून महाराष्ट्राची पहिली शिक्षिका करून स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविली. स्त्रियांसाठी शिक्षणाचे  दार खुले   केले.   सावित्रीबाईच्या जयंती  निमित्ताने  कार्यक्रम घेत असताना सदर केवळ कार्यक्रम घेन्यापुरता तो मर्यादित न राहाता त्यातून आपले जीवन जगताना त्याचा उपयोग झाला पाहिजे . जे  - जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी केलेल्या समाजसुधारणा, संघर्ष, त्याग, लोकाभिमुख कार्याची  सर्वांनी प्रेरणा घेवुन जनसामान्य लोकांपर्यंत  पोहचविण्याचे कार्य  केले पाहीजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. मरपली येथे आयोजित सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात ते   उद्घाटक म्हणून बोलत होते.  
 यावेळी उपस्थितांना पं.  स.सदस्य भास्कर तलांडे, सुनिल तोगम, केंद्रप्रमुख देशपांडे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   गजानन कोंडागूर्ले होते. प्रमुख अतिथी म्हणुन पं.स.सदस्य  भास्कर तलांडे, पं.स.सदस्य  शारदा कोरेत, मरपलीच्या सरपंचा  .सीताबाई वेलादी, उमानूरच्या सरपंचा ताराका आसम, माजी उपसरपंच  कार्तिक तोगम, आदिवासी विविध कार्यकारी संस्थाचे अध्यक्ष  वसंत इष्टम, आ.वि.का.चे उपाध्याय  बापू बेडकी, श्रीनिवास गावडे, श्रीनिवास मडावी, बबलू शेख, अंगणवाडी सेविका रगीवार   ,बघेल आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन   व्येंकटी कोंडागूर्ले  यांनी केले तर आभार  शंकर कोंडागूर्ले  यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिक,  बचत गटाच्या महिला व युवक उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-06


Related Photos