सेवा संकल्प अभियानांतर्गत २२ बालकांची ROP तपासणी : एका बालकावर यशस्वी लेझर शस्त्रक्रिया

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC), गडचिरोली येथे एकूण २२ बालकांची ROP (Retinopathy of Prematurity) तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान एका बालकावर लेझर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित बालकावर यशस्वीरीत्या लेझर शस्त्रक्रिया करण्यात आली.
कमी वजनाने जन्मलेली (LBW), मुदतपूर्व जन्मलेली (Preterm) तसेच नवजात शिशु अतिदक्षता कक्षात (SNCU) उपचार घेतलेल्या अतिजोखमीच्या बालकांमध्ये ROP या डोळ्यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी नियमित नेत्रतपासणी करणे आवश्यक असते. वेळेवर तपासणी व योग्य उपचार केल्यास बालकांच्या दृष्टीचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होते. सदर तपासणी व उपचारासाठी नागपूर येथील माधव नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रक्षिता केने (MS Ophthalmology), संदीप गावठुरे व त्यांच्या चमूने मोलाचे सहकार्य केले.
वेळेत ROP तपासणी करून आवश्यक लेझर उपचार करण्यात आल्यामुळे संबंधित बालकाची दृष्टी सुरक्षित राखण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे अतिजोखमीच्या बालकांमध्ये डोळ्यांच्या आजारांचे लवकर निदान व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत DEIC, गडचिरोलीमार्फत महत्त्वपूर्ण कार्य करण्यात येत आहे.




Petrol Price




