महत्वाच्या बातम्या

 चारचाकी वाहनातून देशी दारूची तस्करी : ९ लाखांचा मुद्देमाल जप्त


- देसाईगंज पोलिसांनी जीपमधून दारू तस्करी करणाऱ्या दोघांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूची वाहतूक व विक्री सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे. देसाईगंज पोलिसांनी कुरुड फाटा मार्गावर केलेल्या कारवाईत देशी दारूच्या २,५०० बाटल्या आणि चारचाकी वाहन असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली दारूविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी देसाईगंजचे पोलिस निरीक्षक स्वप्निल ईजपवार यांना कुरुड ते कुरुड फाटा मार्गावरून पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरुड यांनी केली कारवाई देसाईगंजचे पोलिस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनीष गोडबोले तसेच पोलिस पथकातील नीतेश कडव, तटलावार, सचिन शेले, शैलेश कसारे आणि प्रदीप भसारकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

फाटा रस्त्यालगत सापळा रचून नाकाबंदी केली. सुमारे २ लाख रुपये किमतीची देशी दारू आणि अंदाजे ७लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन (क्रमांक एमएच ४६ पी ५४५९) असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरविंदर सिंग तेजासिंग डांगी २४ वर्ष, रा. जोगापूर, ता. करंजी, जि. चंद्रपूर), हरगोविंदसिंग हरजितसिंग डांगी १८ वर्ष, रा. डोंगरगाव, ता. आरमोरी, जि. गडचिरोली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





  Print






Related Photos