महत्वाच्या बातम्या

 राजुरा-सास्ती मार्गावर कारची स्कुटीला धडक : २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू


- धोपटाळा येथील इंडियन गॅस गोडाऊनजवळ अपघात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा-सास्ती मार्गावर धोपटाळा येथील इंडियन गॅस गोडाऊनजवळ कार आणि स्कुटीची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. करण कृष्ण मुत्तनुरी २४ वर्षे रा. सास्ती असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करण हा सुझुकी अ‍ॅक्सेस स्कुटी क्रमांक MH-34-BX-9398 वरून राजुराकडून सास्तीच्या दिशेने जात होता. दरम्यान, धोपटाळा येथील इंडियन गॅस गोडाऊनजवळ सास्तीकडून राजुराकडे जाणाऱ्या MH-34-CR-0200 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या कारने त्याच्या स्कुटीला समोरून धडक दिली.

या अपघातात करण गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकाने राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कारचालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून अपघात घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






Related Photos