महत्वाच्या बातम्या

 दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आष्टी येथील नवीन इमारतीचे भूमीपूजन व आर्वी येथील इमारतीचे लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / वर्धा :  27 एप्रिल रोजी आष्टी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन सकाळी ९.३० वाजता व आर्वी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन बांधन्यात आलेल्या इमारतीचे लोकापर्ण सकाळी ११ वाजता उच्च न्यायालय मुबंईचे न्यायमुर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते उच्च न्यायालय मुबंईच्या न्यायमुर्ती उर्मिला जोशी- फलके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्वी वकील संघाचे अध्यक्ष ॲङ मोहन गहलोत, आर्वीचे दिवाणी न्यायाधिश कनिष्ट स्तर विजय घराळ, आष्टीच्या वकील संघाचे अध्यक्ष  ॲङ किशोर मतले, आष्टीचे दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर फरहाना शेख यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos