काकडयेली गावात गाव संघटना सदस्यांनी केला मोह सडवा नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / धानोरा :
तालुक्यातील काकडयेली गावामध्ये मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होते. मुख्य रस्त्यावरच गाव असल्याने हे गाव दारूचे माहेरघर झाले होते. मुक्तिपथ तालुका चमूच्या मार्गदर्शनानंतर गावातील काही महिलांनी गावाची दारू बंद करण्याचा निर्णय घेतला. एकेक करत गावातील आणखी महिला आणि युवक संघटनेला जोडले गेले. नुसत्या निर्णय घेऊन त्या महिला थांबल्या नाहीत. तर, गावाच्या दारूमुक्तीसाठी या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या आणि गावाच्या आसपासच्या जंगलातील मोहाचा सडवा नष्ट केला.
ज्या गावात गावातील जवळपास प्रत्येक घरात दारू विक्री होत होती त्या गावात आज दारूबंदीची मशाल पेटत आहे. धानोरा तालुक्यातील दारूचा पेट्रोल पंप म्हणून काकडयेली गावाची ओळख आहे, ती पुसून काढण्यासाठी काल दिनांक २६ रोजी जंगल परिसर गाठून मुक्तिपथ गाव संघटनेने स्वतःहून मोहाचा सडवा नष्ट केला आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-28


Related Photos