महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदार संघातील २५ हजार १५४ नवमतदार बजावणार पहिल्यांदा मतदानाचा हक्क


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. निवडणूक विभागाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवमतदारांची नोंदणी केली असून वर्धा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत १८ ते १९ वयोगटातील २५ हजार १५४ नवमतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे.

०८ वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून अमरावती दोन व वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या सहाही विधानसभा मतदार संघातील १८ ते १९ वयोगटातील २५ हजार १५४ नवमतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे.

धामणगाव विधानसभा मतदार संघातील ३ हजार ४५२, मोर्शी विधानसभा मतदार संघातील २ हजार ७६२, आर्वी विधानसभा मतदार संघातील ५ हजार २७९, देवळी विधानसभा मतदार संघातील ४ हजार ५६, हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील ४ हजार १४७ आणि वर्धा विधानसभा मतदार संघातील ५ हजार ४५८ नवमतदारांचा यामध्ये समावेश आहे.

या निवडणुकीत १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या लक्षणीय आहे. लोकशाहीच्या महोत्सवामध्ये नवमतदारांनी सहभागी होऊन येत्या २६ एप्रिलला उत्साहात मतदान करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos