महत्वाच्या बातम्या

 नारी शक्ती वंदन मॅरेथॉन दौड स्पर्धेत जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : भाजपा जिल्हा महामंत्री योगीता पिपरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : रन फॉर नेशन, रन फॉर मोदी या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली शहरात नारी शक्ती वंदन भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरवात ४ मार्च २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता  इंदिरा गांधी चौक ते आयटीआय चौक पर्यंत स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत १८ वर्षावरील सर्व नवमतदार विध्यार्थीनी, NCC महिला, बचत गटाच्या महिला, एनजिओच्या महिला व जिल्ह्यातील अन्य सर्व महिलांनी मॅरेथॉन दौड स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री योगीता पिपरे यांनी केले आहे.

या स्पर्धेचे शुभारंभ खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजभे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गिता हिंगे यांच्या शुभ हस्ते होणार आहे.

मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ७ हजार १ रुपये, द्वितीय पारितोषिक ५ हजार १, तृतीय पारितोषिक ३ हजार १ रुपये तसेच सहभागी स्पर्धकांना विशेष पारितोषिक म्हणून प्रोत्साहनपर बक्षीस २ प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाने पारितोषिक आयोजित केलेले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos