महत्वाच्या बातम्या

 सीजीएसटी नागपूर झोनला २३ टक्के वाढीसह मिळाला २० हजार ८०६ कोटींचा महसूल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सीजीएसटीच्यानागपूर झोनचे प्रधान मुख्य आयुक्त के.सी. जॉनी यांच्या नेतृत्त्वात कार्यरत नागपूर-१, नागपूर-२, औरंगाबाद आणि नाशिक विभागाला आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २० हजार ८०६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १६ हजार ९०९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

तुलनात्मकरीत्या महसुलात ३,८९७ कोटी अर्थात २३ टक्के वाढीची नोंद झाली आहे.
नागपूर झोनच्या चार आयुक्तालयात नागपूर-२ मध्ये सर्वाधिक महसूल वेस्टर्न कोलफिल्डकडून मिळाला. या विभागाला आर्थिक वर्ष २२-२३ च्या ५ हजार ४१ कोटींच्या तुलनेत ५ हजार ९१४ कोटी (२८ टक्के वाढ) महसूल प्राप्त झाला. नागपूर-१ मध्ये ४ हजार ८२ कोटींच्या तुलनेत ५,२३९ कोटी (१७.३ टक्के), नाशिकला ४ हजार २७७ कोटींच्या तुलनेत ५ हजार ४७९ कोटी (२८.१ टक्के) आणि औरंगाबाद विभागाला ३ हजार ५०० कोटींच्या तुलनेत ४ हजार १७४ कोटी रुपये (२८.१ टक्के वाढ) महसूल मिळाला.





  Print






News - Nagpur




Related Photos