महत्वाच्या बातम्या

 व्यापारी बांधवांनी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना मोठे मताधिक्य द्यावे : आमदार डॉ. देवराव होळी


- पुलखल येथील बैठकीमध्ये व्यापारी बांधवांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने व्यापारी हिताच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेतले असून त्यांना  पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना निवडून देणे आवश्यक आहे, त्याकरिता व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने अशोक नेते यांना मतदान करून मताधिक्य द्यावे असे आवाहन आमदार डॉ. यांनी पुलखल येथील व्यापारी बांधवांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते विधान परिषदेचे आमदार डॉ. रामदास आंबटकर, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, व्यापारी संघटनेचे रमेश सारडा, नंदू काबरा, नंदू सारडा, आशीष अग्रवाल, युवा नेते श्रीकांत भृगुवार प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos